Spread the love

 

पुणे, – खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून, यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप, सिकोर एड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग कार्यालय, गुलटेकडी, पुणे येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात कर्णबधिर तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवण तपासणी करून एकूण १०० लाभार्थींना डिजिटल श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात लाभार्थ्यांना केवळ श्रवणयंत्रच देण्यात आले नाही, तर ऑडिओमेट्री तपासणी, योग्य श्रवणयंत्र बसवणे (फिटिंग), समुपदेशन (कौन्सेलिंग) आणि अंतिम तपासणी या सर्व टप्प्यांवर तज्ज्ञ डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सखोल सेवा दिली. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला.