Spread the love

– ७६ जणांनी केले रक्तदान.

पुणे
(प्रतिनिधी) ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,औंध नगर तर्फे रक्तदानाचा एक कार्यक्रम रविवार दिनांक ८ जुन रोजी आयोजित केला होता.औंध येथील अभिमानश्री सोसायटी समोरील भुवनेश्वर सोसायटी च्या सभागृहात झालेल्या ह्या रक्तदान शिबिरात एकुण ७६ जणांनी रक्तदान करून आपले योगदान दिले.सदर कार्यक्रम ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या जवानांना समर्पित करण्यात आला होता.

या रक्तदान कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये अशी होती.
# जनकल्याण रक्तकेंद्र संस्था पुणे यांनी अद्ययावत उपकरणे, निष्णात डाॅक्टर टीम व योग्य माहितीसह सदर कार्यक्रम यशस्वी केला.
# पर्यावरण गतीविधीच्या माध्यमातून रक्तदात्यांना छोटी रोपटी देण्यात आली.
# प्रथमच रक्तदान करणारे युवक-युवती तसेच महिलांचा सहभाग या शिबीरात मोठया प्रमाणावर होता.
# डाॅक्टर प्रोफेशनमध्ये असणाऱ्या डॉ प्रवीण पारगावकर या रक्तदात्याने आपले १०० वे रक्तदान या कार्यक्रमात केले.

प्रतिथयश उद्योजक सुभाष चुत्तर यांनी द्वीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग स्तरावरील सर्व अधिकारी,नागरिक तसेच सुप्रसिद्ध होमिओपाथ कर्नल डाॅ अनिल हब्बू यांची मुख्य उपस्थिती होती.

मनोज धारप यांनी थोडक्यात शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व विशद केले.

योगेश तळेकर,ऋषिकेश इजंतकर,गिरीश लेले, संजय पानसरे,मधुसूदन बडवे,चंद्रशेखर कुलकर्णी,मुकुंद पुराणिक आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

— मुकुंद पुराणिक
86056 84300
सोबत – फोटो