
8 जुलै 2025 नंतर कोणत्याही दिवशी सदर स्टॉल सील किंवा पाडण्यात येऊ शकते, अशी नोटीस दुकानदारांना खडकी छावणी परिषदेकडून
पुणे/खडकी : पुणे शहरासोबतच संपुर्ण महाराष्ट्रात सध्या धोकादायक असणारी वास्तू खाली किंवा पाडणयाचे सत्र सुरु आहेत. यामागचे एकच कारण आहे ते म्हणजे अनुचित प्रकार घडू नये. याच पावलावर पाऊल ठेवत खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाने ही खडकी भागातील सुमारे 50 ते 54 धोकादायक असणार्या दुकानदारांना दुकाने खाली करण्याची अंतिम नोटीस बजावली आहे.
या नोटीस मध्ये परिणामी, मानवी जीवित आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. छावणी परिषद अधिनियम 2006 च्या कलम 147(1) अन्वये ही कारवाई केली जाणार असून, 8 जुलै 2025 नंतर कोणत्याही दिवशी सदर स्टॉल सील किंवा पाडण्यात येऊ शकतो. या कारवाईसाठी छावणी परिषदेवर कोणतीही जबाबदारी राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया यांनी ही अधिकृत नोटीस स्वाक्षरीसह जारी केली आहे.
तसेच 9 जुलै 2025 रोजी खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाची सर्वसाधारण सभा आहे. या सभेत अंमित निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाने मार्केट स्क्वेअर येथील स्टॉलधारकांना रिकामी करण्यास अंतिम नोटीस बजावली आहे. सदर नोटीस 17 जून 2025 रोजी जारी करण्यात आली असून, 8 जुलै 2025 नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाने याआधी 18 नोव्हेंबर 2022 व 27 सप्टेंबर 2024 रोजीही संबंधित व्यापार्याला नोटीस पाठवली होती. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाने 20 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार, संबंधित स्टॉलची अवस्था अत्यंत धोकादायक असून मानवी वास्तव्य अथवा वापरासाठी पूर्णतः अयोग्य आहे, असे नमूद करण्यात आले आहे.यासंदर्भात स्टॉलवर नोटीस लावण्यात आल्या असून, इशारा फलकही बसवण्यात आले आहेत. परंतु वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी जागा वापरणे चालूच ठेवले आहे. म्हणूनच अंमित नोटीस जारी करण्यात आली आहे.
या नोटीसीमुळे दुकानधारकांमध्ये भितीचे वातावरण आहे. काही व्यापार्यांकडून असे समजते की, खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाने काढलेल्या अंतिम नोटीसला स्टे ऑर्डर आणण्यासाठी कोर्टाची धाव घेणार असल्याचे ही समजते.