
पुणे :भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाउंडेशन यांचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम आणी ‘आरंभ,पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऋतूगंध’ हा सांगीतिक कार्यक्रम शनिवार,दि.१२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे.सहा ऋतूंतील संगीत सौंदर्याचे सादरीकरण या कार्यक्रमातून केले जाणार आहे.ऋतुप्रधान कविता,गप्पा आणि हिंदी-मराठीतील सुरेल गीते यांची सांगड घालण्यात आली आहे.कार्यक्रमाची निर्मिती,संकल्पना,संहिता शीतल दामले यांची असून सूत्रसंचालन चिंतामणी केळकर व शीतल दामले करतील.
गायक कलाकारांमध्ये शेखर केंदळे,मीनल केळकर,समीर चिटणीस आणि प्रतिभा देशपांडे यांच्या सादरीकरणाचा समावेश आहे.समीर बंकापुरे (तबला),प्रसन्न बाम (हार्मोनियम),किमया काणे व चिन्मय कुलकर्णी (सिंथेसायझर) आणि आदित्य आपटे (साईड रिदम) हे साथसंगत करणार आहेत.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रस्तुत होणारा हा २५२ वा कार्यक्रम आहे.सर्व रसिकांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.