पाताळेश्वर महादेव मंदिर धोक्यात; शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा पुरातत्त्व खात्याला खडा इशारा

Spread the love

 

पुणे,  – पुण्यातील पांडवकालीन पाताळेश्वर लेणीतील महादेव मंदिराची अवस्था भीषण झाली असून, मंदिरातील शिवलिंग पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. मंदिरात अभिषेकासाठी पाण्याची कोणतीही सोय नाही; भक्तांना पाणी लांबून आणावे लागत आहे.

नंदी मंडपाचे दगडी छत अत्यंत धोकादायक स्थितीत असून, ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते. धोक्याचा फलक गेली अनेक वर्षे लावून ठेवून पुरातत्त्व खात्याने जबाबदारी झटकली आहे, पण दुरुस्तीच्या दिशेने कोणतीच ठोस पावले उचललेली नाहीत.

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना (ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन, महाराष्ट्र राज्य, प्रमुख) व श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. गौरव घोडे यांनी खडा इशारा दिला –

> “पाताळेश्वर महादेव मंदिर हा लाखो शिवभक्तांचा श्रद्धास्थान आहे. येत्या १५ ते २० दिवसांत पुरातत्त्व खात्याने दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम तातडीने सुरू करावे. अन्यथा, आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हे काम पूर्ण करू. दुर्घटना घडल्यास जबाबदारी पुरातत्त्व खात्याची असेल!”

 

पुण्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या लेणीचे संवर्धन करण्याची तातडीची गरज असून, पुरातत्व विभागाने तात्काळ दखल घ्यावी , अशी संतप्त मागणी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि शहरातील शिवभक्तांनी व्यक्त केली आहे.
यावेळी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना व श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ गौरव घोडे, भगवान श्रीमंदिलकर संस्थापक अध्यक्ष राजर्षी शाहू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य,नितीन गायकवाड, प्रितेश बधे, प्रदीप तिकोने, अतिष वाघमारे, आदित्य कामठे, पियुष तनपुरे, रोहित सागर खुडे,प्रथम बनसोडे, सुरज साबळे, विशाल वैराट, अविनाश पवार, राजाभाऊ खंडाळे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *