पत्रकार दत्ता सुर्यवंशी यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

कोल्हापूर : फुले शाहू  आंबेडकर विचार चळवळीत गेली 20 वर्ष संविधान जनजागृती अभियान राबविणारे दै सम्राट च्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडून सामान्य जणांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे बोपोडी या भागात प्रत्येक क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविणारे धडाडीचे लोकप्रिय पत्रकार दत्ताजी सुर्यवंशी ( पुणे ) यांच्या सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक व पत्रकांराना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी दिली आहे .
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या निमित्ताने पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा वतीने दर वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते . पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी हॉल येथे शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सांयकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे . या क्रार्यक्रमास सामाजिक विचारवंत प्रा डॉ शरद गायकवाड , जेष्ट पत्रकार डॉ दगडू माने , राजू घाटगे , शेतमजुरांचे नेते सुरेश सासने , मोहन मालवणकर , राजेंद्र मोहीते , पत्रकार योगेश पांडव ॲड ममतेश आवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *