साहित्यरत्न लो. डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेच्या वतीने जल्लोषात साजरी…!

Spread the love

अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेच्या वतीने सालाबाद प्रमाणे लो. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा लो.डॉ. अण्णाभाऊ साठे गुणगौरव पुरस्कार, जेष्ठ विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे नेते आयु. वसंतरावजी साळवे यांना संघटनेचे अध्यक्ष श्री. अंकुशराव साठे, बहुजन भिमसेनेचे अध्यक्ष मोहनराव म्हस्के, महोत्सवाचे अध्यक्ष सुरेश पवार, तुषार मोहिते, विजय अवचिंदे, बी.एम. कांबळे, रवि नायर, करिम शेख, रमेश ढोणे, राहूल वाघमारे, आदींच्या हस्ते शॉल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी वनवर्धिनी फाऊंडेशनचे अध्यक्ष आयु. विजय ढोणे यांनाही सामाजिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी प्र.पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा.न.से. प्रकाश ढोरे, आनंदजी छाजेड, अॅड. रमेश पवळे, मोहनराव म्हस्के, पोपट खंडागळे, सादिक शेख, मंगेश रुपटक्के, इंद्रजीत भालेराव, ज्योती परदेशी आदींनी अण्णाभाऊंना अभिवादनपर विचार मांडले. सर्वांचा अंकुशराव साठे यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने भारत वाघमारे, राम साठे, सुर्यकांत सकट, विजय अवचिंदे, चंद्रकांत देवकुळे, सुरेश पवार, मारुतराव धेंडे, दादाभाऊ गोठे, समीर नाईक, राधाबाई पवार, सुंदरताई ओव्हाळ, संजीवनी देवकुळे आदींचा सन्मान केला. कार्यक्रमास आमदार सिध्दार्थदादा शिरोळे यांनीही भेट देवून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या त्यांचाही सन्मान अंकुशराव साठे, मोहनराव म्हस्के, सुरेश पवार, अतुल गायकवाड आदींच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. सदर प्रसंगी राजेंद्र भुतडा, मल्हारी वाघमारे, विनोद यादव, मयुरेश गायकवाड, शशिकांत ओव्हाळ, विजय साळुंखे, राजेश परमार, मंगेश गायकवाड, मोहन देवकुळे, करिम तुर्क, सचिन कांबळे, तन्मय दवंडे, अशोक गायकवाड, सुनिल थोरात, जगन्नाथ जाधव, शिवाजी कसबे, पांडुरंग गायकवाड, राजेश कांबळे, राहुल पुंडे, विशाल धाडगे, उत्तम शेंडगे, रफिक शेख, रमेश स्वामी, साळुंखे, शिंदे, आशिष पवार, सलमान शेख, मितीन मरपाळे, धनंजय जगताप, महेंद्र ना. कांबळे, मोहम्मद शेख, दादा भोसले, अॅड. विठ्ठल आरुडे, गोरख नेटके, संदीप देवकुळे, राजेश धंगेकर, अर्जुन गायकवाड, सुभाष पाडळे, गणेश चोरगे, विजय गायकवाड, खुपसे साहेब, अनिल कांबळे, विजय जगताप, राजन कांबळे, शाहरुख शेख, मुश्ताक शेख, सौ. आरती धेंडे, कौशल्या पवार, मिराबाई शेंडगे, सोनाली वाघमारे, आशा गायकवाड, उषा धेंडे, रंजना भिसे, गायत्री साठे, वैशाली गायकवाड, संगीताताई खंडागळे आदी महिला, पुरुष, नेते, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन मा. विनोद सोनवणे यांनी केले तर आभार सुरेश पवार यांनी मानले, विशेष सहकार्य सुर्यकांत सकट, अनिल गायकवाड, शिरीष देवकुळे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *