
पिंपळे गुरव, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज लक्ष्मी लक्ष्मी राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील 100 हून अधिक पुरस्कार मिळवलेले मा. श्री. अरुण गस. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत मोफत 5000 वृक्षांचे वृक्षदान व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हा उपक्रम 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता जय हनुमान नगर, गणेश मंदिर, पिंपळे गुरव येथे होणार आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच 500 ज्ञानेश्वरी गाथा आणि 500 तुकाराम गाथा यांचे मोफत वाटप करण्यात येणार असून, राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त शालेय साहित्य वितरण देखील होणार आहे.