खडकी पोलिसांची प्रभावी कारवाई – लाखो रुपये किमतीचा एम.डी. अमली पदार्थ जप्त, एक सप्लायर अटक

Spread the love

एम.डी. (Mephedrone) या घातक अमली पदार्थाचा वाढता प्रसार युवकांच्या आरोग्यास आणि सामाजिक व्यवस्थेस गंभीर धोका निर्माण करत आहे. अमली पदार्थविरोधी मोहिमेला गती देत खडकी पोलिसांनी खडकी परिसरात छापा टाकून लाखो रुपये किमतीचा एम.डी. जप्त केला असून अरबाज आरिफ मेमन (वय 20, रा. खडकी) या सप्लायरला अटक करण्यात आली आहे.

परिसरात एम.डी.चे पेडलिंग सुरू असल्याची मिळालेल्या गुप्त माहितीची पडताळणी केली असता आरोपी हा स्थानिक पेडलर नेटवर्कला पुरवठा करणारा सप्लायर असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या मागील पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असून अमली पदार्थाची हालचाल, स्रोत आणि वितरण मार्ग काटेकोरपणे तपासले जात आहेत. एम.डी. हा शरीरावर गंभीर दुष्परिणाम करणारा पदार्थ असल्याने शासनाने अमली पदार्थांविरोधात कडक धोरणे राबवली असून सदर आरोपीवर NDPS Act अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे.

जप्त केलेला एम.डी. हा लाखो रुपये किमतीचा असून त्याचा परिसरातील पेडलर्समार्फत वितरण करण्याचा आरोपीचा उद्देश असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या छापा मोहीमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, सपोनि मुद्दसिर पटेल व पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पो. ह. हेमंत वाघमारे, शशी संकपाळ, आबा केदारी, शशांक डोंगरे, सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, अनिकेत भोसले, सुधाकर तागड रुषीकेश दिघे आणि यांनी समन्वयाने व प्रभावीपणे कारवाई केली.

संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सो, मा. सहआयुक्त रंजन शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त (झोन 4) सोमय मुंडे, पोलीस सहायक आयुक्त विठ्ठल दभडे तसेच पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

खडकी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अमली पदार्थांविरोधातील लढाईत सक्रिय सहकार्य करावे. परिसरात कुठलीही संशयास्पद हालचाल, ड्रग्जची विक्री किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित खडकी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. वेळ, ठिकाण आणि संबंधित वर्णन यासह दिलेली तुमची माहिती समाजातील युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत ठरेल.

अमली पदार्थांपासून दूर राहा — स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य व भवितव्य सांभाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *