गोरिबांप्रति तुमची आत्मियता आम्ही जवळून अनुभवतोय!- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद तांबे

Spread the love

 

अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ आणि श्री समर्थ सेवा प्रतिष्ठानचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांची गोरगरिबांप्रति कणव आहे. दुर्बल आणि असंघटित क्षेत्रासाठी जे काम करता; त्याचा प्रचंड आनंद आणि कौतुक वाटतं अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद ऊर्फ बंडूशेठ तांबे यांनी व्यक्त केली.

महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ घरोघरी संपर्काअंतर्गत आज श्री पाटील यांनी कोथरूड मधील हिंगणे होम कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद ऊर्फ बंडूशेठ तांबे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोथरुड मतदारसंघाचे भाजप महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, नगरसेविका वृषाली चौधरी, दत्ताभाऊ चौधरी, आदित्य बराटे, राजू मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत शितोळे, हभप बाळासाहेब मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते मनोहर माळी, भाजपा युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष गौरव खैरनार यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आनंद ऊर्फ बंडूशेठ तांबे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चंद्रकांतदादा पाटील यांनी तळागाळातील प्रत्येक घटकांसाठी काम केले आहे. यातून त्यांची आर्थिक दुर्बल घटकांप्रतिची आत्मियताच प्रतित होते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालकांठी केलेले काम अवर्णनीय आहे. त्यामुळे कोथरूड मधील प्रत्येक नागरिक त्यांच्यावर भरभरुन प्रेम करत आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच, निवडणूक निकालानंतर कोथरुड विधानसभा मतदारसंघातील ते भरघोस मतांनी विजयी होतील; आणि महायुतीच्या मंत्रिमंडळात पहिल्या पाच मध्ये त्यांचा समावेश असेल, अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ आणि श्री समर्थ सेवा प्रतिष्ठानचा चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे पत्र पाटील यांना सुपूर्द केले. याबद्दल पाटील यांनीही कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *