महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे चौथे राज्यस्तरीय योग महासंमेलन पुनीत बालन यांच्या सौजन्याने संपन्न
आळंदी : योग शिक्षकांचा महासंमेलन आळंदी येथे नुकतेच साजरे झाले यामध्ये योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते . विख्यात योगाभ्यासी असे प्रिन्सिपल ऑफ योग कॉलेज कैवल्यधाम येथील डॉक्टर शरदचंद्र भालेकर, द लोणावळा इन्स्टिट्यूट चे संचालक डॉक्टर मन्मथ घरोटे, भारतीय संस्कृती दर्शन चे संचालक डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख, तसेच…

