कँटोन्मेंटच्या विकासासाठी बागवे यांना विजयी करा काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन
भाजपच्या सरकारच्या काळात कँटोन्मेंटचा विकास ठप्प झाला आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. कँटोन्मेंटच्या विकासासाठी जनतेने रमेश बागवे यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी केले. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या महात्मा…

