विधानसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ९२३ गुन्हे दाखल; ८४३ व्यक्तींना अटक
पुणे, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ऑक्टोबर २०२४ पासून ९२३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ८४३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९६ वाहनासह ३ कोटी ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपूत यांनी दिली…

