वसुबारसच्या मुहूर्तावर बापूसाहेब पठारेंचा उमेदवारी अर्ज दाखल
येरवडा, पुणे: वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी (ता. २८) महानिर्धार रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. खराडी गाव ते येरवडा क्षेत्रीय कार्यालय या मार्गाने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी सहभागार्थींना संबोधित केले. नागरिकांनी यावेळी मोठा प्रतिसाद दर्शवला. २००९-२०१४ मध्ये ज्या पद्धतीने वडगावशेरी मतदारसंघात मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करत एक…

