
रमणबाग प्रशालेतील गोपाळांची दहीहंडी
दहीहंडीचा कार्यक्रम गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. दहीहंडी विषयीचे चिंतन शाळेतील पाचवीतील विद्यार्थी अर्ष कालेकर याने सादर केले. शालासमिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर, मुख्याध्यापक अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कलाग्राम मधील कृष्ण मंदिरातील कृष्णाचे विधिवत…