शिरुर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा 100 टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार

पुणे: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 100 टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगिता राजापुरकर तसेच स्वीप नोडल अधिकारी प्रीतम पाटील यांच्या…

Read More

दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन

पुणे: दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रत्यक्ष जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दे. हंगे (नि.) यांनी केले आहे. पोस्टाने हयातीचे दाखले पाठविणाऱ्या लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दाखले पोहचतील याची दक्षता घ्यावी. हयातीचे…

Read More

वडगाव शेरी विधानसभा संघात लोहगाव व रामवाडी परिसरात मतदार जनजागृती

पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकांच्यावतीने संत तुकाराम महाराज मंदिर, लोहगाव तसेच ५० टक्के पेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्राच्या परिसरात रामवाडी मेट्रो स्टेशन येथे मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नागरिकांसोबत मतदार जनजागृती रॅली काढून येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी शंभर टक्के मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे समाजसेवक पांडुरंग…

Read More

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ९१ जेष्ठ नागरिक व सहा दिव्यांग अशा एकूण ९७ मतदारांच्या गृह मतदानासाठी आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसात गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविली आहे. गृह मतदान पथकामध्ये एक मतदान अधिकारी,…

Read More

महाविकास आघाडीच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका : अजित पवार

पुणे : प्रतिनिधी चंदननगर येथे शुक्रवारी दुपारी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापू पठारे यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या बजेटची आकडेवारी जाहीर करीत पवार यांनी महाविकास आघाडीच्या घोषणापत्राची पोलखोल केली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,…

Read More

उद्योग विभागांतर्गतच्या आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश

पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केल्याची माहिती डॉ.दिवसे यांनी दिली आहे. या…

Read More

पुणे कॅन्टोंमेंट विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल

पुणे,दि. ७: भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोंमेंट मतदार संघातील ५ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून ही मतदान केंद्र गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी कळविली आहे. या बदलानुसार मोलेदिना टेक्नीकल ज्युनिअर कॉलेज, शंकरशेठ रोड, इलेक्ट्रीकल विभाग, खोली क्रमांक १ येथील मतदान केंद्र…

Read More

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त अन्न पदार्थांचा २४ लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे, दि. ७ : दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे विभागात व जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती आदी अन्न पदार्थांचा एकूण २४ लाख ७ हजार ९१८ रूपयांचा साठा जप्त केला आहे. दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ४८ तर अन्न आस्थापनेतून…

Read More

भाजपच्या महागाईला जनता कंटाळली महाविकास आघाडीचा विजय निश्चित! – दत्ता बहिरट

महागाईने मध्यमवर्गीय व गरीबवर्गाचे कंबरडे मोडले असून, त्याकडे लक्ष न देता, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जीएसटी व अन्य करांमध्ये वाढ करीत महागाई वाढवतच आहे. केवळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघच नव्हे, तर साऱ्या राज्यात व देशात जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. नुसती आश्वासने देणाऱ्या व विकास न करणाऱ्या भाजपाला जनता आता कंटाळली आहे. नागरिकांना महागाई नको…

Read More

रमेश बागवे यांचा विजय निश्चित! घोरपडी परिसरातील नागरिकांची ग्वाही

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात रेल्वे फाटकामुळे अनेक नागरिकांना रोज अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत आहे. येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे. मात्र केंद्रात व राज्यात १० वर्षे भाजप सत्तेवर असूनही घोरपडीतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा…

Read More