भीमाशंकर मंदिराला श्रावणमासादरम्यान होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी नवीन गर्दी व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने ३० दिवसांच्या श्रावण यात्रेदरम्यान सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि दर्शन सहजसाध्य करण्यासाठी आगळ्यावेगळ्या गर्दी व्यवस्थापन पायलट प्रकल्पाची सुरुवात केली आहे, यशस्वी ठरल्यास हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. भीमाशंकर, ५: भारतातील प्रमुख तीर्थस्थळांवर विशेषतः श्रावणासारख्या सणासुदीच्या महिन्यांत भाविक मोठ्या संख्येने येतात, परिणामत: गर्दी वाढते. ज्यामुळे सुरक्षितता, गर्दी नियंत्रण आणि एकूण तीर्थयात्रेच्या अनुभवाबाबत चिंता निर्माण होते. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूजनीय असलेले भीमाशंकर मंदिर येथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात. मर्यादित प्रवेश असलेल्या डोंगराळ प्रदेशात वसलेले हे मंदिर श्रावणात लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेते, ज्यामुळे अनेकदा लांब रांगा आणि गर्दी पाहायला मिळते. या दीर्घकालीन आव्हानाला तोंड देण्यासाठी मोहित कंबोज भारतीय फाउंडेशनने केअरटेनसोबत…