घातक हत्यार बाळगणारे ०२ आरोपीताना व चोरीच्या गुन्ह्यातील एक आरोपी असे ०३ गुन्ह्यातील आरोपीना मा. खडकी न्यायालयाने सुनावली शिक्षा

पुणे : दि. ०१/०६/२०२३ रोजी व दि. ०२/०६/२०२३ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, खडकी न्यायालय, खडकी पुणे यांनी खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १०९ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) मधील आरोपी नामे, संतोष सुरेश जाधव, वय ४५ वर्षे, रा. बोपोडी, पुणे, तसेच खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १८८ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) मधील आरोपी नामे, रोहन राजेंद्र रिठे, वय २४ वर्षे, रा. खडकी पुणे यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, खडकी कोर्ट पुणे यांनी अनुक्रमे, १) ३०००/- रु द्रव्यदंड व मे. कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा व दंड न भरल्यास १० दिवस सश्रम कारावास व आरोपी क्र. २ यास गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस रु ५०००/- व मे कोर्ट उठेपर्यंत उभे राण्याची शिक्षा ठोठावली दंड न भरल्यास १० दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

तसेच खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ७६ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे, कुणाल उर्फ बाबु प्रल्हाद ठाकुर, वय २१ वर्षे, रा. गोसावी वस्ती, कॅनॉलजवळ, पुणे मनपा शाळेच्या पाठीमागे हडपसर पुणे यास गुन्हा सिध्द झालेने सदर आरोपीस ०१ वर्षे कारवास व रु. २०००/- द्रव्यदंड व दंड न भरल्यास १० दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४, पुणे शहर श्री शशिकांत बोराटे, मा. सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्रीमती आरती बनसोडे, खडकी पोलीस ठाणे पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टाचे कामकाज पाहणारे, पोलीस हवालदार गणेश मुथय्या, पोलीस अंमलदार विजयसिंग गिरासे, पो. अंमलदार सिध्दार्थ खंदारे यांनी साक्षीदार, पुरावे मा. न्यायालयात हजर करणेकामी विशेष मेहनत घेतली आहे.