. अन्यथा मोदींनी नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांना पंतप्रधान पदासाठी संधी द्यावी – हेमंत पाटील

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणूक काळात जाती पातीचे राजकारण केले. इडी, सीबीआय चा वापर करून विरोधकांना घाबरवण्याचे काम केले. मात्र आगामी पाच वर्षांच्या काळात मोदींनी केवळ विकासाचे राजकारण करावे. अन्यथा त्यांनी नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांना पंतप्रधान पदासाठी संधी द्यावी, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली.

लोकसभा निवडणुक 2024चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये एनडीए ला बहुमत मिळाले असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार असे चित्र आहे. यावर राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

हेमंत पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी मागील 10 वर्षांच्या काळात जाती पातीचे राजकारण केले. विरोधकांना विरोध करण्यासाठी इडी, सीबीआय चा वापर करून त्रास दिला. इतकेच नव्हे तर निवडणूक काळात दलित नेत्यांना बरोबर देखील घेतले नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यावा. येत्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी केवळ विकासाचे राजकारण करावे. संविधान बदलाचे किंवा लोकसभेत ठराव पास करून वेगवेगेवळे नियम तयार करण्यावर भर देवू नये.  नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात त्या पद्धतीने ओबीसींना त्यांनी काय दिलं हे सांगावे. त्यांच्यासाठी प्रयत्न करावेत. दलित समाजातील सर्व नेत्यांना सोबत घेवून काम करावे, अशी अपेक्षा आहे. तसेच हे मोदींना शक्य नसेल तर जनता दलाचे नितेश कुमार किंवा तेलगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांना पंतप्रधान पदाची जबाबदारी द्यावी.

पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले की, मोदींना आणि भाजपला ही शेवटची संधी आहे.  या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा. लोकांपर्यंत विकास पोहचवावा. त्यामुळे मोदींनी पुढील काळामध्ये चांगला विकास करावी आमची अपेक्षा आहे.