लव्ह जिहाद’चे नावे विद्वेषाचे राजकारण नको- अत्याचारी विकृतीला जात धर्म नसतो.. कायदेशीर कारवाई व्हावी.. काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी,

  • पुण्यात १५ दिवसांचा ‘सामाजिक सलोखा व सदभावना ’पंधरवडा
    पुणे, दि ५ –
    शैक्षणिक माहेरघर, सांस्कृतिक शहर व सामाजिक क्रांतीकारकांची पुण्यनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
    पुणे शहरात सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने रहात आले आहेत. मात्र,भाजप आमदार नितेश राणे यांनी नुकतेच पुण्यातील घोरपडी येथे ‘लव्ह जिहाद’चे निमित्ताने भेट देत सामाजिक दुहीचे व द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा निंदनीय प्रकार राजकीय हेतूने केला आहे. अत्यल्प संख्येने पुढे येणारी ‘लव्ह जिहाद’ प्रकरणे समर्थनीय नाहीतच.. मात्र त्याचे समाजात विद्वेष पसरवण्याचे राजकारण न होता, त्यातील महिला अत्याचारातील पीडितांना न्याय व दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे..!!
    लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांची नोंद घेऊन त्यांना न्याय, सहकार्य व सुरक्षा देण्यासाठी राजीव गांधी स्मारक समितीचे सर्व धर्मिय व सामाजिक कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे समिती अघ्यक्ष व काँग्रेसनेते गोपाळदादा तिवारी यांनी जाहीर केले..!
    समाजातील सलोखा व सदभावना कायम ठेवण्यासाठी “५ जून ते १९ जून ( काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जन्मदिन ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जन्मदिन) यादरम्यान ‘सामाजिक सलोखा व सदभावना पंधरवडा’ राबविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली.
    ते पुढे म्हणाले, राजीव गांधी स्मारक समिती सदस्य व इंटक पदाधिकारी ॲड फैयाज शेख यांचे… गणेशोत्सव मंडळ, शिवाजी नगर, गांवठाण येथे महीला अत्याचार प्रश्नी आढावा घेऊन…परीसरांत लव्ह जिहाद वा मुलींवरील अत्याचारांची काही प्रकरणे आहेत काय(?) याची माहीती घेऊन.. या सदभावना व ‘सामाजिक सलोखा पंधरवड्याची’ सुरवात करण्यात आली..!
    ‘लव्ह_जिहाद् वा महीला अत्याचार’ प्रकरणांची नोंद घेत, पिडीतांना न्याय व सुरक्षा देण्यासाठी समिती सदस्य व सर्व धर्मिय काँग्रेसजन पिडीतांना करतील… असे ही काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले….!
    या प्रसंगी,
    शहर काँग्रेस मा. उपाध्यक्ष श्री सुभाष थोरवे, श्री रामचंद्र शेडगे, भोला वांजळे, वकील सेलचे ॲड संदिप ताम्हणकर, इंटक नेते व ॲड फैयाझ शेख, ॲड सचिन अडसुळ, ॲड श्रीकांत पाटील, हरिदास अडसुळ, नंदकुमार पापळ, श्री धनंजय भिलारे, सुरेश ऊकीरंडे, विनायक पाटील, विकास दवे, सुभाष जेधे, ऊदय लेले, गणेश शिंदे, भारत पवार, घनश्याम निम्हण, गणेश गुगळे इ उपस्थित होते..!
    संबंधित (लव्ह जिहाद) प्रकरणी अत्याचार पिडितांना न्याय, मदत व सुरक्षा देण्याचे हेतूने ‘शहराच्या विविध भागात’ सामाजिक, राजकीय व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात येतील.
    मात्र, अशा घटनांचा राजकीय हेतूने सामाजिक द्वेष, तणाव निर्माण करण्यासाठी वापर होऊ नये याची दक्षता घेऊन सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक दुही व ध्रुवीकरणास नागरिकांनी बळी पडू नये याकरिता हा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचसोबत बैठकांत संबंधित परिसरातील सामाजिक व विकासाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येईल.
    ते पुढे म्हणाले, एखाद्या अत्याचार पिडित प्रकरणात महिलेची ओळख उघड होऊ नये यासाठी आमदार पदावर असणाऱ्या नितेश राणे यांनी जबाबदारीने वागण्यास हवे होते. परंतु असंवेदनशीलपणे व बेकायदेशीरपणे त्यांनी पिडितेस प्रसारमाध्यमांसमोर आणुन तीचे प्रती अन्यायाचे सामाजिक द्वेषास खतपाणी धालणारे निंदनीय राजकारण केले आहे. पोलीसांनी याची नोंद व पुरेशी काळजी घ्यावयास हवी होती..
    लव्ह जिहादच्या नावाखाली मोर्चे काढून सामाजिक ध्रुवीकरणाचा कुटील डाव खेळला जात असून तो निंदनीय आहे. दुसरीकडे “राष्ट्रीय महीला कुस्तीपटू” अनेक दिवसांपासून दिल्लीत अंदोलन करत असून, त्याप्रकरणातील ‘हिंदू अत्याचारीं विकृतींना’ पाठीशी घालत अधर्माचे राजकारण सतत हिंदु धर्माचे नाव घेणाऱ्यांनी करु नये.
    कथित हिंदुत्वाच्या ढोंगी ठेकेदारांनी, देशाचा जगात लैकिक वाढविणाऱ्या खेळाडू मुलींना गंभीर घटना घडूनही न्यायसाठी झगडावे लागत आहे याचे आत्मपरीक्षण करावे असे ही गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे..!
    ————————————————