आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सर्वांनी आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी सर्वानी येतला पाहिजे : मोहन जोशी

पुणे : पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड देण्याची सुविधा बाबतीत कार्यक्रम आयोजित केला होता . ह्या आयुष्यमान भारत कार्ड योजनचे उद्घाटन म.प्र.काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी मोहन जोशी आपल्या भाषणात म्हणाले आजच्या आपल्या जीवनात अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते , सध्याच्या परीस्थितीमधे ही योजना सर्वांच्या फायद्याची आहे ह्या भारत आयुष्यमान योजनेची सुविधा मौरभ अमराळे ह्यानी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे , युवक काँग्रेस नेहमी पुणेकरांच्या हिताचे काम करतात तरी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आपण सर्वांनी आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी घेतला पाहिजे सौरभ अमराळे ह्यांच्या या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा असे मा.आ. मोहन जोशी आपल्या भाषणात म्हणाले . यानंतर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगितले . या कार्यक्रमास माजी महापौर कमलताई व्यवहारे , माजी पी.एम.टी अध्यक्ष बाळासाहेब अमराळे , पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके , ब्लॉक अध्यक्ष प्रविण करपे , बबलूशेठ कोळी , विराज सोंडकर , धनश्री अमराळे , कुणाल काळे , विवेक कडू परवेझ तांबोळी , आनंद खन्ना , ओंकार मोरे , अक्षय नवगिरे , मंगेश निम्हण , इत्यादी मान्यवर उपस्थित होते , यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी मा.आ. मोहन जोशी यांचा धनलक्ष्मी देवीची प्रतिमा व शाल लेवून सत्कार केला , तसेच दिवस रात्र नागरिकांच्या हितासाठी सेवा करणाऱ्या पोलिस दलातील कर्मचारी ह्यांची आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आणि सर्व उपस्थित नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड विमा योजनेची माहिती देण्यात आली .