सेरेब्रल पाल्सी आणि विशेष मुलांना सक्षम करण्यासाठी रीमा पटेल या १४ वर्षिय भारतीय अमेरिकन मुलीने हाती घेतली प्रेरणादायी मोहिम.

 ‘सेरेब्रल पाल्सी भावंडाच्या जीवनात बदल घडवुन आणण्यासाठी ती  जागरूकता निर्माण करत आहे.

पुणे – रीमा पटेल ही एक १४ वर्षिय  अमेरिकन निवासी असलेली भारतीय मुलगी आहे,  सेरेब्रल पाल्सी (CP) असलेलेल्या तिच्या भावाने तिच्या जीवनावार खोलवर प्रभाव पाडत आहे. त्याच्यामुळे प्रेरित होऊन  अश्या प्रकारच्या सेरेब्र्ल पाल्सी आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी  रीमाने ‘सिबलिंग्स ऑफ द एक्सेप्शनल’ (https://www.siblingsoftheexceptional.com/) ची स्थापना केली आहे, जे सेरेब्रल पाल्सी आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांसाठी जागरूकता आणतात आणि त्यांना समर्थन देतात.

विशेष मुलांसाठी सहानुभूती आणि सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने प्रेरित, रीमाला एक असे जग निर्माण करण्याचे स्वप्न आहे जिथे या सेरेब्रल पाल्सी आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना प्रेम दिले जाते त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात आणि त्यांना समान संधी प्रदान केल्या जातात. रीमाच्या या उपक्रमाद्वारे  या मुलांना अथक समर्पण आणि विश्वासाने मार्गदर्शन केले जाते, ते मानतात की  क्षमता विचारात न घेता  प्रत्येक व्यक्ती ही  आदर, प्रेम आणि समर्थनास पात्र आहे.

सेरेब्रल पाल्सी आणि विशेष लोकांच्या गरजांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि अपवादात्मक गरजा असलेल्या मुलांमध्ये  आणि त्यांच्या अन्य भावंडाचे नाते दृढ करने हे रीमाचे ध्येय दुहेरी आहे. सामाजिक अडथळे दूर करत विशेष गरजा असलेल्या मुलांच्या क्षमता आणि कलागुणांना ओळखुण त्यांना उन्नत करणे हे तिचे उद्दिष्ट आहे.

आपल्या अतूट वचनबद्धतेद्वारे, रीमाने आजपर्यंत सुमारे US$९,७४० (अंदाजे ₹८००,०००) यशस्वीरित्या उभे केले आहेत. सीपी मुलांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांना अत्यावश्यक संसाधने, उपचार आणि योग्य वातावरण प्रदान करण्यासाठी अथक परिश्रम करणार्‍या भारतातील असंख्य एनजीओंना समर्थन देण्यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

रीमाने तिचे ध्येय पुढे नेण्यासाठी  अनेक प्रभावी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याच अनुषंगाणे २४ जून २०२३ रोजी पुण्यातील पोकर परिवार वसतिगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  तिने बडी सेंटर इन्स्टिट्यूट -ए कुनाशिनी इनिशेटीव्हला एक मोठी रक्कम दान केली. यावेळी उपस्थीत असलेल्या  प्रमुख पाहुण्या डॉ. अर्चना कदम यांनी रीमाच्या या विलक्षण प्रयत्नांची प्रशंसा केली आणि सेरेब्रल पाल्सी आणि विशेष गरजांबद्दल जागरुकता वाढवण्याबद्दल मौल्यवान माहिती दिली.

या कार्यक्रमाने विशेष गरजा असलेल्या मुलांना एकत्र येण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून काम केले, आणि समुदायीक भावना वाढवुन या मुलांना  आनंददायक अनुभव दिले. रीमा तर्फे आयोजित केल्या जाणार्या या  कार्यक्रमांचे उद्दिष्ट आहे खास आठवणी निर्माण करणे आणि एका परिवारातील सामान्य आणि अश्या प्रकारच्या विशेष भावंडामध्ये  मजबूत बंध निर्माण करणे.

रीमा व्यक्ती, संस्था आणि व्यापक समुदायाला तिच्या उदात्त हेतूला पाठिंबा देण्यासाठी  आवाहन करते. सीपी आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आवश्यक संसाधने , सेवा, देणग्या, निधी उभारणीचे प्रयत्न करताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ती म्हणते तुमचे योगदान त्यांच्या जीवनात मूर्त बदल घडवू शकते.

रीमाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आणि तिच्या या उपक्रमात योगदान देण्यासाठी किंवा आगामी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कृपया https://www.siblingsoftheexceptional.com/ वर ‘सिबलिंग्स ऑफ द एक्सेप्शनल’ ला भेट द्या.

सहानुभूती आणि समजूतदारपणा महत्त्वाच्या असलेल्या या जगात, सीपी मुलांच्या हक्क आणि कल्याणासाठी रीमा पटेल यांचे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी आपण एकत्र येऊ या आणि या अपवादात्मक व्यक्तींसाठी एक उज्ज्वल भविष्य घडवू या.

या कार्यक्रमाचे प्रायोजक होते, उमिया हार्डवेअर आणि, धर्मील एंटरप्राइजेस (बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर).