स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी केतकी चितळे ने केलेला हा प्रयत्न : मा.विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्यासारख्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात पोस्ट करणारी केतकी चितळे म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्ती असून तिचा वेळीच बीमोड करणे आवश्यक आहे. अभिनय क्षेत्रात काम मिळत नाही म्हणून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी चितळे ने केलेला हा प्रयत्न म्हणजे तिला मिळालेल्या संस्काराचे दर्शन आहे. अशा विकृत मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी पुणे महापालिकेच्या मा.विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

केतकी चितळे, वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांची पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारी व असंतोष पसरवणारी आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाड करून महाराष्ट्र घडवण्यासाठी अविरत झटणाऱ्या पवार साहेब यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राच्या संस्कृतिला परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न अशा समाज कंटकांकडून सुरू असून त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.

कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनोरंजन करायचे असते पण या स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्या केतकी चितळे मध्ये वेगळेच कलागुण असून ते समाजाला घातक असल्याने तिच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई करून बंदोबस्त करावा.