प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक, ओजामीन चे नवे ब्रँड अँबेसेडर

 प्राचीन आयुर्वेदाचा अभ्यास करून तयार केलेले ओजामीन लोकांना मधुमेहाशी लढण्यास मदत करण्याचे ध्येय ठेवते. 

पुणे,: ओजामीन भारताच्या टाइप 2 मधुमेहावर उपचार करणारी औषधी आहे जी आयुर्वेदाचा अभ्यास करून लोकांना मधुमेहाशी लढण्यास मदत करते. ओजामीन ने मराठी चित्रपट उद्योगातील योगदानासाठी ओळखल्या जाणार्‍या डॉ. गिरीश ओक ह्यांना आपले ब्रँड अँबेसेडर जाहीर केले . 

 100% हर्बल टॉनिक असलेल्या ओजामीनचा शोध 1974 मध्ये श्री. एल.के. ताटे, (बी.ए. LLB, I.R.S. सहाय्यक कस्टमचे जिल्हाधिकारी) ह्यांनी लावला. वयाच्या चाळीशीच्या सुरुवातीला श्री. ताटे यांना मधुमेहाचे निदान झाले. त्यांनी अनेक ‘पाश्चिमात्य औषधांचा’ अवलंब केला ज्याचा त्यांच्यावर फारच कमी परिणाम झाला. तेव्हा श्री.टेटे यांनी उपायांसाठी आयुर्वेदिक ग्रंथांचा संदर्भ घेतला आणि त्या प्रेरणेतूनच 1960 मध्ये ‘ओजामिन’ नावाच्या हर्बल औषधींची निर्मिती झाली. 

सुरुवातीपासूनच ओजामिनचा प्रवास नाविन्यपूर्ण होता. ह्या टॉनिकमुळे भारतात अनेक लोकांना टाईप २ मधुमेहाचा प्रतिबंध करण्यास मदत झाली. आज जेव्हा भारत  मधुमेहाची जागतिक राजधानी बनला आहे, तेव्हा आरोग्यदायी जीवनाला चालना देणारे टॉनिक आणि व्यक्तींच्या सर्वांगीण कल्याणात योगदान देणारे आयुर्वेदिक पूरक म्हणून ओजामिनला बाजारात अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  

असोसिएशनवर भाष्य करताना ताटेज रेमेडीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद ताटे म्हणतात, “  डॉ. गिरीश ओक आमचे ब्रँड अँबेसेडर आहेत हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या इतकेच ते सुद्धा आयुर्वदाबद्दल उत्साही आणि विश्वासू आहेत ! डॉ. गिरीश ह्यांचे आमच्या बरोबर असणे आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल,असा आमचा ठाम विश्वास आहे.” डॉ. गिरीश ओक जे  स्वतः शोध आणि निरोगी जीवनाला महत्व देतात, त्यांच्याबरोबर मिळून आम्ही आमच्या ग्राहकांना ओजामिन आयुर्वेदिक टॉनिकच्या नियमित सेवनाने अनेक आरोग्यविषयक फायदे कसे होऊ शकतात ह्याचे शिक्षण देण्याचा निर्धार करत आहोत. 

ह्यावेळी भाष्य करताना डॉ. गिरीश ओक म्हणाले, “ओजामिन हा असा एक ब्रँड आहे जो मी बऱ्याच काळापासून वापरत आहे आणि त्याचे उत्कृष्ट परिणाम सुद्धा मी अनुभवले आहेत  . ब्रँड अँबेसेडर  किंवा चांगल्या आरोग्याचा अँबेसेडर म्हणून ओजामीन शी जुळण्यात मला फार फार आनंद आहे.  श्री. प्रसाद यांची आयुर्वेदाबद्दलची आवड, मधुमेह आणि ग्रस्त कुटुंबियांना चांगले आरोग्य मिळविण्यासाठी मदत करण्याचे त्यांचे ध्येय हे एक कारण आहे ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मला आशा आहे की एकत्रितपणे आम्ही आयुर्वेदिक उपचारांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करून लोकांना त्याबद्दल शिक्षित करू शकू.” 

ओजामिन आता काही काळापासून बाजारात आहे, पण त्याचा प्रवास साठच्या दशकात सुरू झाला जेव्हा श्री. एल. के. ताटे यांनी मधुमेहाविरुद्ध स्वतःच्या लढ्यासाठी एक अनोखे हर्बल टॉनिक बनवले. ओजामिन अपवादात्मक गुणवत्तेसाठी वचनबद्ध आहे.  निसर्गातील सर्वोत्तम रहस्ये, आयुर्वेदाचे सौंदर्य आणि आधुनिक काळातील उपाय – सर्व एकाच बाटलीत ओजामीन ने एकत्र आणले !