“मावळा” गीताद्वारेइंडियाआशा फौंडेशनचा’हर घर तिरंगा’ अभियानात सहभाग

 दहा दशलक्ष नागरिकांच्या प्रतिसादाचे ध्येय

पुणे,  :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. इंडियाआशा फौंडेशनतर्फे या अभियानात वेगळ्याप्रकारे सहभागी होण्यासाठी एक देशभक्तीपर गीत तयार करण्यात आले आहे –  ” मी एक निनावी मावळा “. दि. १३ ऑगस्ट रोजी हे गीत प्रसारितकरण्यात येणार आहे.हर घर तिरंगा अभियानांतर्गत एक आठवड्यात दहा दशलक्ष नागरिकांनी हे गीत ऐकावे/पहावे असे उद्दिष्ट संस्थेने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले कुटुंबीय, नातेवाईक व परिचित अशा किमान १० सदस्यांपर्यंत मावळा गीत पोहचवावे असे आवाहन इंडियाआशा फौंडेशनतर्फे करण्यात येत आहे.  

देशसेवेचा वसा स्वीकारून निष्ठेने भारतीय जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करतात. थंडी, ऊन, पाऊस व इतर अनेक अडचणींचा सामना करत रात्रंदिन शत्रूशी दोन हात करत असतात. आपलं कुटुंब, गाव असा संकुचित विचार न करता मातृभूमीची सेवा करत भारताचे स्वातंत्र्य, सुरक्षा व स्थैर्य अबाधित राखण्यासाठी झटत असतात.दरवर्षी  स्थल, वायू व नौसेनेत भरती होण्यासाठी लाखो तरुण प्रेरित होतात. मातृभूमीच्या रक्षणाचे बाळकडू त्यांना आपल्या कुटुंबियांकडून, गावातील लोकांकडून व मातीतूनच मिळते. प्रत्येक भारतीयासाठी आदर्श व जीवनातले खरे ‘ हिरो ‘ घडवण्यात अनेकांचे हातभार लागतात. देशाच्या कानाकोपऱ्यातील गावातून आलेले हे अनोळखी ‘ हिरो ‘ सैन्यात भरती होतात. भारतमातेला असे अनोळखी, न पाहिलेले हिरो दिल्याबद्दल प्रत्येक गावकऱ्याच्या उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियाआशा फौंडेशनतर्फे देशभक्तीपर गीत तयार केले आहे ” मी एक निनावी मावळा ” .        

            सीमेवर लढणारे जवान तर महान आहेतच परंतु आरोग्य,शेती, क्रिडा, कला, साहित्य, संशोधन, उदयोग अशा इतरही क्षेत्रात निष्ठेने काम करून अनेक लोकांनी भारताचे नाव जगात उज्ज्वल केले आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, देशसेवेसाठी प्रेरणा मिळावी व देशाची प्रतिमा जगभरात सकारात्मकरित्या उंचावण्याचे काम ” मी एक निनावी मावळा ” या गीतातून होणार आहे.

गायिका/संगीतकार हिमांगी विश्वरूप यांचा थोडक्यात परिचय –

उत्कटतेने भावनाप्रधान गाणी गाणारी गायिका व संगीतकार हिमांगी विश्वरूप यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण लहानपणापासून आपल्या मातोश्री ऋचा विश्वरूप यांच्याकडे घेतले. २०१४ सालापासून शास्त्रीय संगीताचे धडे शंकर महादेवन अकादमी मध्ये घेतले व तेथेच संगीत शिक्षिका म्हणून २०१८ सालापर्यंत त्या कार्यरत होत्या.मूलतः आयटी इंजिनीअर  असलेल्या हिमांगी यांनी संगीताची आवड असल्याने आपली जास्त पगाराची नोकरी सोडून संगीत आराधनेसाठी स्वतःला वाहून घेतले. मराठीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्री. अशोक पत्की यांच्याकडेही त्यांनी शिक्षण घेतले व त्यांची सहकारी म्हणून काम केले. टी सिरीज अंतर्गत श्री संजय विद्यार्थी यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. शंकर महादेवन अकादमीतर्फे त्यानी संगीत दिलेल्या गझलचे प्रसारण श्री. शंकर महादेवन व उस्ताद झाकीर हुसेन यांच्या उपस्थितीत झाले.सध्या सुप्रसिद्ध गझल गायक तलत अझीझ यांच्याकडे त्या प्रशिक्षण घेत आहेत. लहानपणापासून अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील  कार्यक्रमात त्यांनी सहभाग दिला आहे. यात  झी वाहिनीवरील अंताक्षरी , स्टार प्लस वाहिनीवरील क्या मस्ती क्या धूम, अँड टीव्ही वाहिनीवरील किलर कराओके इत्यादी कार्यक्रमाचा समावेश आहे. संगीत विषयाव्यतिरिक्त त्यांना नृत्याचीही आवड आहे. सध्या त्या शामक डावर नृत्य कंपनीमध्ये नृत्याचे शिक्षण घेत असून विविध कार्यक्रमातत्यांनीसादरीकरणही केले आहे.  

गीतकार/ निर्माता श्री. संजीव दहिवदकर यांचा थोडक्यात परिचय

सध्या अमेरिकेत वास्तव्य असलेले श्री.संजीव दहिवदकर मूळचे धुळे येथील आहेत.  आयटी कंसल्टंट असलेले दहिवदकर आयटी शास्त्र इंडिया या कंपनीचे तसेच इंडियाआशा फौंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. लेखनाची आवड असलेल्या दहिवदकर यांनी कोहम धाबा तसेच रनिंग बिझिनेस घाटी वे हि पुस्तके लिहिली आहेत. टाइम्स वृत्तसमूहाच्या वर्तमानपत्रातून अर्थविषयक लेख तसेच विविध मासिकातून पर्यटन विषयक लेख लिहिले आहेत. भारतीय कला, साहित्य, संस्कृती यांचा अभ्यास व आवडही श्री. दहिवदकर याना आहे. ” मी एक निनावी मावळा ” या देशभक्तीपर गीतातून त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीरांबद्दल तसेच देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.                 

इंडियाआशा फौंडेशनचे संस्थापक श्री. संजीव दहिवदकर यांच्याया गीताला गायिका हिमांगी विश्वरूप यांनी स्वरसाज देऊन आपल्या मधुर आवाजात गायले आहे. संगीत संयोजन श्री. समाधान वर्तक यांनी केले आहे तसेच निता दुसाने यांनी या प्रकल्पात सहाय्य केले आहे.”मी एक निनावी मावळा” हे देशभक्तीपर गीत दि. १३ ऑगस्टपासूनwww.indiaasha.org या संकेतस्थळावरीलhttps://youtu.be/pTWZmMFYGyY या युट्युब लिंकवर उपलब्ध आहे

केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारीच नव्हे तर रोजच देशसेवा व देशाभिमान प्रत्येक भारतीयाच्या नसानसात जागृत करण्यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे गीत पोहचविण्याचे आवाहन इंडियाआशा फौंडेशनतर्फे केले आहे.