पुन्हा एकदा पुण्यात रेड एफएम घेऊन येत आहे ‘मराठी फिल्म फेस्टिवल’ चा ५वा सीझन

‘चर्चा तर होणारच’ थिमवर पार पडेल मराठी फिल्म फेस्टिवल चा ५वा सीझन

भारतातील आघाडीचे खाजगी रेडिओ आणि मनोरंजन नेटवर्क, Red FM ने आज प्रसिद्ध ‘मराठी फिल्म फेस्टिवल’सीझन 5 जाहीर केला. हे सिनेमॅटिक सेलिब्रेशन आता पुण्याची एक सांस्कृतिक ओळख बनले आहे आणि, यावर्षी 8 ते 10 मार्च 2024 दरम्यान NFAI लॉ कॉलेज रोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे.

गेल्या काही वर्षांत ‘मराठी फिल्म फेस्टिवल’ हा सिने रसिकांसाठी, एक महत्त्वाचा कार्यक्रम बनला आहे. या वर्षी, ‘चर्चा तर होणारच’ या विषयावर केंद्रीत असलेल्या या 3 दिवसांच्या महोत्सवात, एकूण 25 चित्रपट प्रदर्शित केले जातील, ज्यात 15 फीचर फिल्म्स, 10 लघुपट आणि 3 प्रीमियर्स यांचा समावेश आहे. याशिवाय, प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

टोरॉंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, प्रीमियर झालेला आणि NETPAC पुरस्कार जिंकणारा, जयंत सोमळकर यांचा चित्रपट-‘स्थळ’ ह्याने 8 मार्च रोजी या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. ‘बाई पण भारी देवा’, ‘झिम्मा -2.’, ‘एकदा काय झाल’, आणि ‘पंचक’, यांसारखे लोकप्रिय चित्रपट तसेच, सावनिक कौरचा माहितीपट ‘अगेन्स्ट द टाइड’, आणि – मधुकत झेंडे ज्यांनी चार्ल्स शोभराजला अटक केली, यांच्यावरील प्रसिद्ध चित्रपट, ‘झेंडे’ यातील अनेक कलाकार आणि क्रू-सदस्यांच्या उपस्तिथीत प्रदर्शित केले जातील.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक अशोक राणे दिग्दर्शित ‘आणखीन एक मोहेंजोदारो’ चा वर्ल्ड प्रीमियर देखील महोत्सवात पाहायला मिळेल, ‘कुर्ला ते वेंगुर्ला’, आणि ‘धर्मस्य’ सोबतच ‘धूम धडाका’ चे स्पेशल स्क्रिनिंगही होणार आहे, ज्यासाठी महेश कोठारे उपस्थित राहणार आहेत. यावर्षी, महोत्सवात काही अतिशय प्रतिभावान तरुण चित्रपट निर्मात्यांचे काही उल्लेखनीय मराठी लघुपट देखील प्रदर्शित केले जात आहेत.

या महोत्सवाच्या निम्मिताने बोलताना, रेड एफएम आणि मॅजिक एफएमच्या डायरेक्टर आणि सीओओ, निशा नारायणन म्हणाल्या, “नवीन वर्षाचे दोन महिने आणि भारताचा प्रादेशिक वारसा जतन करणाऱ्या, अनुभवात्मक उत्सवांच्या लाटेने रेड एफएम दुमदुमले आहे. इतर अनेक सोहोळ्यांसह, आम्हाला मराठी चित्रपट महोत्सवाचा सीझन 5 जाहीर करताना आनंद होत आहे – एक असा उत्सव जो व्यायसायिकतेच्या पलीकडे जाऊन मराठी चित्रपटांचे समर्थन करतो. एक ब्रँड म्हणून उद्देश्यपूर्ण सिनेमाला पुढे येण्याचा वाव देणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मराठी चित्रपट महोत्सवासोबत, आम्ही आमचे श्रोते आणि महाराष्ट्राच्या सिनेमातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत.”

रेड FM ने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुन्या चित्रपट उद्योगाचा सन्मान करून, प्रेक्षक आणि सेलिब्रिटींना एकत्र आणण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. स्क्रीनिंग व्यतिरिक्त, कलाकृतीं मागच्या विचारांचा, पडद्यामागील किस्से, आणि उद्योग तज्ञांशी चर्चेचा उपस्तिथीताना आनंद लुटता येणार आहे, यामुळे मराठी चित्रपट महोत्सव हा सिनेफिल्म आणि रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

‘मराठी फिल्म फेस्टिवल’ सीझन 5 संदर्भात अधिक अपडेट्स आणि घोषणांसाठी, Red FM शी संपर्कात रहा. कार्यक्रम विनामूल्य आणि विनातिकीट असेल. सहभागासाठी इच्छुक, अधिकृत वेबसाइट www.marathifilmfestival.in वर नोंदणी करून पास मिळवू शकतात.

93.5 RED FM बद्दल:

Red FM हे केवळ भारतातील सर्वात मोठे रेडिओ चॅनेलच नाही, तर सर्वात मोठ्या मनोरंजन नेटवर्कपैकी एक आहे. आम्ही हायपर लोकल, हायपर व्होकल आहोत तसेच आमच्या ब्रँड तत्वज्ञानाने आणि ‘बजाते रहो’- या वृत्तीने आम्ही हजारो मिल्लेनिअल्सच्या हृदयाच्या केंद्रस्थानी आहोत. आमचा दोन दशके जुना वारसा आणि कौशल्याचा उपयोग करून, आम्ही ‘लार्जर दॅन लाईफ’ चे बीज पेरतो. देशभरातील ६९ रेडिओ स्टेशन्सच्या मोठ्या पदचिन्हांद्वारे श्रोते आणि श्रोत्यांशी भावनिक संबंध जोडून आम्ही वाटचाल करतो.

आम्ही नाविन्यपूर्ण पॉडकास्ट, डिजिटल शो आणि ऑन-ग्राउंड इव्हेंट तयार करतो, स्वतंत्र संगीत वैशिष्ट्यीकृत करतो, 360-डिग्री आवाज उठवतो आणि सत्य बोलतो. ‘अभिव्यक्तीचे स्टेशन’ म्हणून Red FM ने BEST BRAND, BEST FM STATION, आणि BEST RJ सह 567 हून अधिक पुरस्कार-विजेत्या मोहिमांचा गौरव केला आहे.