‘देशात येत असलेले कोट्यावधींचे ड्रग्ज’ मोदी सरकारचेच अपयश..!

‘अंमली पदार्थांपासून’ देशास सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी सरकारची नाही का..?
ड्रग्ज मुक्त देशाची गॅरंटी मोदी का देत नाहीत ..?
गुजरात मधील ड्रग्जचा महाराष्ट्राला विळखा पडलाय का..?
मोठ्या शहरांत रात्री ऊशीरा पर्यंत हुक्का पार्लर्स व पब ची संख्या वाढत असुन दहशत वादी कृत्ये व स्त्रियांवरील अत्याचार वाढत असल्साचा दावा ही काँग्रेस ने केला..!

  • काँग्रेसचा संतप्त सवाल
    पुणे : – पुणे पोलीस आयुक्त व त्यांची टिम रोज विविध ठीकाणाहून ड्रग्ज पकडून जप्त करीत आहेत, मोदी सरकार देशात १० वर्षे सत्तेत राहूनही कोट्यावधींचे ड्रग्ज (अंमली पदार्थ)आले कुठुन (?) या गंभीर प्रश्नापासून सरकार ला पळ काढता येणार नसून, सत्तेतील भाजपला याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
    काही महीन्यापुर्वी सातत्याने गुजरात मधील अडानींच्या ‘मुंद्रा पोर्टवर’ पकडण्यात आलेले कोट्यावधींचे ड्रग्ज नष्ट केल्याचे दाखले – संदर्भ देखील गृह विभागाने जाहीर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
    ७० वर्षात सर्वाधिक क्राईम रेट देशात व राज्यात वाढला असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
    देशातील तरूण पिढीस नशेच्या खाईत ढकलण्याचे पापकर्म करण्याचे धाडस कोणी करू नये असा सज्जड दम देखील काँग्रेसने भरला.
    देशाच्या सिमा ओलांडून देशांतर्गत येत असलेले अंमली पदार्थ केंद्रीय गृह विभागास दिसत नसून, या ड्रग्जना मोदी सरकार रोखू शकत नसल्याचे सिध्द झाले आहे.
    त्यामुळे ते पकडण्यास राज्यातील व पुणे शहरातील पोलिसांवर ताण पडत आहे. पोलीसांना इतर सुरक्षेकडे लक्ष देण्यास ही मर्यादा येत आहेत, ही देशाच्या गृह – खात्यास लाजीरवाणी बाब असल्याचे ही काँग्रेस ने म्हंटले आहे.
    एके काळी देशात सुरक्षीत व सुसंस्कृत शहर म्हणून ख्याती असलेले ‘पुणे शहर व महाराष्ट्रास’ ड्रग माफीयांचे केंद्र करावयाचे आहे काय..(?) असा सवाल काँग्रेस ने उपस्थित केला असून, ससून हॅास्पीटल मधून अंमली पदार्थाचे रॅकेट चालवणाऱ्या डॅा संजीव ठाकूरला अद्यापही अटक का केली जात नाही(?) ललीत पाटील आरोप पत्र दाखल का केले जात नाही (?) असे संतप्त सवाल ही राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
    —————