शासन आपल्या दारी उपक्रमाला कसबा मतदारसंघात उस्फुर्त प्रतिसाद

भाजपा निवडणूक प्रमुख श्री. हेमंत रासने यांच्या पुढाकारातून मिळाला हजारो नागरिकांना लाभ

पुणे : शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अनेकवेळा नागरिकांना संपूर्ण माहिती नसल्याने अडचणी येतात, हे लक्षात घेत आज भारतीय जनता पार्टी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करत लाभ मिळवून देण्यात आला. जवळपास ३२१४ नागरिकांना यामध्ये सहभाग नोंदवला.

कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत भाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात नागरिकांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार योजना, आधारकार्ड दुरुस्ती, रेशनकार्ड, अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले आर्थिक विकास कर्ज योजना, अपंग कल्याणकारी योजना, आयुष्यमान भारत कार्ड, आवास योजना, विश्वकर्मा कर्ज योजना यांसारख्या विविध योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. पुणे शहर तहसीलदार श्री. सूर्यकांत येवले यांनी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली.

यावेळी बोलताना श्री. हेमंत रासने म्हणाले, “या उपक्रमाद्वारे नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल माहिती आणि लाभ मिळवून देणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांची चकरा मारव्या लागतात. परंतु आज आम्ही शासन आपल्या दारी या उपक्रमातून एकाच ठिकाणी नागरिकांना सर्व सरकारी योजना उपलब्ध करून दिल्या आणि या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहत उत्तम प्रतिसाद दिला याबद्दल धन्यवाद”

यावेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, अर्चना पाटील, गायत्री खडके, योगेश समेळ, अजय खेडेकर, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, मनिषा लडकत,उदय लेले, सुनिल खंडागळे, छगन बुलाखे, कसबा मतदारसंघाचे पालक संजय मामा देशमुख, कसबा मतदारसंघ सरचिटणीस अमित कंक, राजू परदेशी, प्रशांत सुर्वे, उमेश चव्हाण, वैशाली नाईक, प्रणव गंजीवाले, राणीताई कांबळे, चंद्रकांत पोटे, ओ बी सी आघाडी अध्यक्ष देवेंद्र वडके, कसबा मतदारसंघ महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार, कसबा मतदारसंघ युवा मोर्चा अध्यक्ष. निर्मल हरिहर तसेच कसबा मतदारसंघातील प्रभाग अध्यक्ष सुनिल रसाळ, भारत जाधव, सनी पवार, उमेश दुरंडे, अभिजित रजपूत, विजय गायकवाड तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरचिटणीस अमित कंक व प्रभाग क्रमांक १६ चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.